शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:56 IST

फिर्यादी हे संगणक अभियंता असून लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरस्तीचा व्यवसाय करतात.

लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याची १५ लाखांची फसवणूकपुणे : लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने एका संगणक अभियंत्याला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी केतन सुनिल पळशीकर (वय ३६, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन भरत निलेश कुमार (वय २६, रा. रोपसी जालोर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ मार्च २०२१पासून आतापर्यंत घडला आहे.

फिर्यादी केतन पळशीकर हे संगणक अभियंता असून लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरस्तीचा व्यवसाय करतात. भरत कुमार हा घाऊक लॅपटॉप विक्री करतो. त्यातूनच त्यांच्या आर्थिक व्यवहार झाला होता. सुरुवातीला फिर्यादींनी आरोपीला आरटीजीएस द्वारे ५ लाख रुपये दिले. त्यानंतर आणखी १० लाख रुपये दिले. असे एकूण १५ लाख रुपये भरत कुमारला दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे त्याने फिर्यादींना लॅपटॉप दिले नाहीत. याबाबत फिर्यादीने तक्रार अर्ज विश्रामबाग पोलिसांकडे दिला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीlaptopलॅपटॉपPoliceपोलिस