वाहनावरील ताबा सुटला अन् जिवाला मुकला, १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 15:28 IST2022-03-12T15:25:38+5:302022-03-12T15:28:35+5:30
डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाल्याने मृत्यू...

वाहनावरील ताबा सुटला अन् जिवाला मुकला, १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू
पुणे : भरधाव जाताना वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दुचाकी धडकली. त्यात १४ वर्षाच्या दुचाकीचालक मुलाचा मृत्यु झाला आहे. त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
निखील नितीन पेटकर (वय १४, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील पेटकर हा अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन त्याचा मित्र सुमित सुजित बरनवाल (वय १६, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला घेऊन गुरुवारी दुपारी केशवनगरमध्ये जात होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याणी बंगला रोडवर वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी डाव्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला जाऊन जोरात धडकली.
या धडकेत निखील याच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्याबरोबर असलेला सुमित बरनवाल हा किरकोळ जखमी झाला आहे.