सावत्र बापाकडून 11 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 11:30 IST2022-11-21T11:25:02+5:302022-11-21T11:30:02+5:30

अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

11-year-old girl sexually abused by stepfather, shocking incident in Pune | सावत्र बापाकडून 11 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुण्यातील धक्कादायक घटना

सावत्र बापाकडून 11 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे/प्रतिनिधी/किरण शिंदे : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात वडील आजोबा आणि काकानेच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुण्याच्या दत्तवाडी परिसरातूनही अशीच घटना घडली आहे. सावत्र बापानेच अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी 32 वर्षीय नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या 32 वर्षे आईने या प्रकरणी तक्रार दिली. 9 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडला. 

घरात कोणी नसताना केले अत्याचार

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीचा दुसरा पती आहे. फिर्यादी महिलेची पहिल्या पतीपासून झालेली अकरा वर्षाची मुलगी त्यांच्या सोबतच राहते. दरम्यान नऊ नोव्हेंबर रोजी घरात कुणी नसताना आरोपी बापाने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करत लैंगिक शोषण केले. हा प्रकार जेव्हा पीडित मुलीच्या आईला समजला तेव्हा त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 11-year-old girl sexually abused by stepfather, shocking incident in Pune