राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी; 'या' तालुक्यात होणार ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:15 IST2026-02-17T16:15:12+5:302026-02-17T16:15:32+5:30

जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप पाहता अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती.

11 new additional district collectors in the state; 69 additional tehsil offices will be set up in 'this' taluka | राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी; 'या' तालुक्यात होणार ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये

राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी; 'या' तालुक्यात होणार ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये

पुणे : वाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात पुणे विभागात तीन, तर अन्य सर्व विभागांत प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, तर चाकण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप तसेच सामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती. नव्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मितीसाठी त्यात येणारी तालुक्यांची संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी, तसेच दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यांतील सर्वात दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर तसेच प्रस्तावित कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ विचारात घेण्यात आले आहे.

तर नव्या अतिरिक्त तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळांची महसुली गावांच्या नावासह संख्या, या कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून तालुक्यांतील सर्वांत दूरच्या गावांचे अंतर तसेच प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर यांचा विचार करण्यात आला आहे.

प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालये

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात बारामती, सातारा जिल्ह्यात फलटण, तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात कल्याण, तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव. छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यात किनवट. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यात अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद, बुलडाणा जिल्ह्यात खामगाव. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर.

प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालये

तालुका- गावाचे नाव
कुर्ला- चेंबूर
बोरिवली- मालाड
अंधेरी- वांद्रे
ठाणे- नवीन मुंबई
कल्याण - डोंबिवली
भिवंडी- भिवंडी (ग्रामीण)
डहाणू- कासा
वसई- विरार
पालघर- बोईसर
राजापूर- रायपाटण
खेड- चाकण
फलटण- साखरवाडी
कराड- उंब्रज
उत्तर सोलापूर- वडाळा
चंदगड- नजरे कार्वे
निफाड- लासलगाव
सिन्नर- सिन्नर
बागलाण- नामपूर
जळगाव- जळगाव
जामनेर- शेंदुर्णी
चाळीसगाव- चाळीसगाव
नंदूरबार- नंदूरबार
शहादा- शहादा
अक्कलकुवा- मोलगी
शिरपूर- शिरपूर शहर
अकोले- राजूर
नेवासा- घोडेगाव
सिल्लोड- अजिंठा
बीड- नेकनूर
आष्टी- कडा
जालना- जालना शहर आणि राजूर
परभणी- परभणी
जिंतूर- बोरी
लातूर- लातूर
नांदेड- नांदेड
हदगाव- तामसा
मुखेड- मुक्रमाबाद
किनवट- इस्लापूर
अमरावती- अमरावती (ग्रामीण)
अकोला- अकोला (शहर)
पुसद- शेंबाळ पिंपरी
उमरखेड- ढाणकी
सिंदखेड राजा- साखरखेडा
मेहकर- डोणगाव
खामगाव- लाखनवाडा
वाशीम- अनसिंग
रिसोड- केनवड
कारंजा- कामरगाव
नागपूर (ग्रामीण)- बुटीबोरी आणि हुडकेश्वर
हिंगणा- वानाडोंगरी
नागपूर- नागपूर (शहर)
कामाठी- वडोदा
सावनेर- खापरखेडा
काटोला- कोंढाळी
नरखेड- जलालखेडा
मौदा- कोदांमेढी
कुही- वेलतूर
हिंगणघाट- अल्लीपूर
सेलू- सिंदी
पवनी- अड्याळ
चार्मेाशी- आष्टी
कुरखेडा- मालेवाडा
आरमोरी- वैरागड
धानोरा- पेंढारी
सिंरोचा- आसरअल्ली
एटापल्ली- कसनसूर
अहेरी- जिमलगट्टा

Web Title : महाराष्ट्र में 11 नए अतिरिक्त जिला कलेक्टर, 69 तहसील कार्यालय खुलेंगे

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने छह संभागों में 11 नए अतिरिक्त जिला कलेक्टरों और 69 अतिरिक्त तहसील कार्यालयों को मंजूरी दी। पुणे को तीन, अन्य को एक-एक मिलेंगे। इसका उद्देश्य प्रशासनिक बोझ को कम करना और जनसंख्या, भूगोल और दूरदराज के क्षेत्रों को ध्यान में रखते हुए सार्वजनिक पहुंच में सुधार करना है। बारामती और चाकण चुने गए स्थानों में से हैं।

Web Title : Maharashtra to Get 11 New Additional District Collectors, 69 Tehsils

Web Summary : Maharashtra government approves 11 new Additional District Collectors and 69 additional Tehsil offices across six divisions. Pune gets three, others one each. This aims to reduce administrative burden and improve public access, considering population, geography, and remote areas. Baramati and Chakan are among the chosen locations.