६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती; पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:43 IST2026-02-17T14:43:10+5:302026-02-17T14:43:24+5:30

जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित केली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे ठराविक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे

10 administrators appointed to 67 Gram Panchayats; Administrative duties taken over in Purandar Taluka | ६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती; पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती

६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती; पुरंदर तालुक्यात प्रशासकीय कारभार हाती

नीरा : पुणेजिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुका अंतर्गत ६७ ग्रामपंचायतींवर १० प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी प्रशासकीय कारभार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारीनिहाय गावांची जबाबदारी निश्चित केली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे ठराविक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्यानुसार पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी बी.बी. चखाले यांच्याकडे साकुर्डे, दौंडज, कोळविहीरे, केतकावळे, सुपे खुर्द, पिंपळे, भिवडी, पूरपोखर व देवडी अशी ९ गावे देण्यात आली आहेत. 

पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एस.डी. कांबळे यांच्याकडे कुंभारवळण, दिवे, सोनोरी, झेंडेवाडी, जेऊर, परिंचे, वाघापूर व गुऱ्होळी अशी ८ गावे सोपविण्यात आली आहेत.  पुरंदर पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र गिरमे यांच्याकडे चांबळी, हिवरे, मांडकी, गराडे, भिवरी व बोपगाव अशी ६ गावे देण्यात आली आहेत. पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एस.एस. नेवसे यांच्याकडे तक्रारवाडी, वाळूंज, धालेवाडी, खळद, निळूंज, बेलसर, शिवरी, पांढे व आंबळे अशी ९ गावे देण्यात आली आहेत. पुरंदर पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.व्ही. ढवळे यांच्याकडे टेकवडी, राजेवाडी व हरणी अशी ३ गावे आहेत. 

पुरंदर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एन.के. धापटे यांच्याकडे पिंपरी, नायगाव, रिसे, पिसे, पारगाव, पिसर्वे, मावडी सुपे व बोऱ्हाळवाडी अशी ८ गावे देण्यात आली आहेत. पुरंदर पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी बी.डी. काकडे यांच्याकडे पानवडी, काळदरी, मांढर, माहूर, हरगुडे, तोंडल, लपतळवाडी व सटलवाडी अशी ८ गावे सोपविण्यात आली आहेत. पुरंदर पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी ए.आर. जेधे यांच्याकडे आंबोडी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द, आस्करवाडी, थापेवाडी, सोमुर्डी व खानवडी अशी ७ गावे देण्यात आली आहेत. पुरंदर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एस.बी. ताठे यांच्याकडे नाझरे सुपे, नाझरे क.प., पिंपरे खुर्द, पिसुर्टी व निरा शिवतक्रार अशी ५ गावे देण्यात आली आहेत.  पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी.एच. लाखे यांच्याकडे जवळार्जुन, पांडेश्वर, राख व मावडी क.प. अशी ४ गावे सोपविण्यात आली आहेत. अशा प्रकारे एकूण ६७ ग्रामपंचायतींचा कारभार आता १० प्रशासकीय पातळीवर अधिकारी चालवणार असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हेच अधिकारी विकासकामे, निधी वापर, शासकीय योजना व दैनंदिन प्रशासन पाहणार आहेत.

Web Title : पुरंदर तालुका में 67 ग्राम पंचायतों पर प्रशासकों की नियुक्ति

Web Summary : पुरंदर में कार्यकाल पूरा होने पर 67 ग्राम पंचायतों के लिए दस प्रशासक नियुक्त। चुनाव तक अधिकारी विकास, निधि, योजनाओं और प्रशासन का प्रबंधन करेंगे, जिससे सुचारू संचालन सुनिश्चित होगा।

Web Title : Administrators Appointed to 67 Gram Panchayats in Purandar Taluka

Web Summary : Ten administrators appointed to manage 67 Gram Panchayats in Purandar due to term completion. Officials will oversee development, funds, schemes, and daily administration until elections are held, ensuring smooth governance.