बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार;

By Admin | Updated: July 2, 2014 02:12 IST2014-07-02T02:12:54+5:302014-07-02T02:12:54+5:30

शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला

1 laborer killed in building collapse slab; | बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार;

बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार;

लोणावळा : शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला, तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत़
सोमवारी दुपारी ३़४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ स्लॅब बांधण्यासाठी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्यांमुळेच हा सापळा खाली कोसळल्याचे ग्रामस्थ सांगत होते़
लालबहादूर (वय २५, रा़ पश्चिम बंगाल) असे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुराचे नाव असून, कपुरसिंग व रुपवतो (पूर्ण नावे समजू शकली नाही. दोघेही रा. पश्चिम बंगाल) हे जखमी झाले आहेत़ शिलाटणे गावाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत डॉ़ तिवारी यांचे बांधकाम सुरू आहे़ या बांधकामाचे दुसरा स्लॅब बांधण्याचे काम सुरू असताना सोमवारी दुपारी स्लॅबचा सापळा खाली कोसळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे, सहायक निरीक्षक संदीप येडे, हवालदार विजय मालुसरे, वसंत कदम आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले़ (वार्ताहर)

Web Title: 1 laborer killed in building collapse slab;