शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 10:43 IST

नितीन गडकरींची राज्य सरकारवर जोरदार टीका; फडणवीस यांच्याकडूनही सरकारचा समाचार

नागपूर: महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही, अशी टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. 'नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं,' असं गडकरींनी म्हटलं. निवडणुकीत जातीपातीचं राडकारण व्हायला नको, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 'माणूस जातीनं मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचं राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,' असं गडकरी म्हणाले.

विश्वासघात करत राज्यात तीन पक्षांचे सरकार आलं. पण आज सरकारमधील एकही मंत्री वर्षभरातलं आपलं काम सांगू शकलेला नाही, अशी टीका यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना दिलेलं वचन लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचं वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावं यासाठी योजना आणली. मात्र हे सरकार काय करतंय माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असंही फडणवीस पुढे म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा