शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 18:43 IST

Hasan Mushrif : आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात.

ठळक मुद्देमुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात कायमच राजकीय खेचाखेची सुरू असते.

कोल्हापूर : गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. त्याला संदर्भ होता अर्थातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा.

भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे मुश्रीफ यांना आमदार पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी ही संधी साधली.

मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील भेटीवेळी भाजपाचे सदस्यही उपस्थित होते. त्यांनाही मुश्रीफ यांनी प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी दिला आणि भाजपाचे कारभारी सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, ‘अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.’

मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात कायमच राजकीय खेचाखेची सुरू असते. आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर