शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

“सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 4:30 PM

Swapnil Lonkar Suicide: स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.  

ठळक मुद्देसरकारला विद्यार्थ्यांचं काही देणंघेणं नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्या करिअरची काळजी आहे.कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून MPSC दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाहीआज मुलांनी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत.

मुंबई – पुण्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरूणाच्या आत्महत्येमुळे(Swapnil Lonkar Suicide) विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लाखो MPSC ची तयारी करणारे तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार सुधारत नाही असा घणाघात भाजपा आमदार राम सातपुते(BJP Ram Satpute) यांनी केला आहे.

याबाबत आमदार राम सातपुते म्हणाले की, स्वप्निल लोणकर या तरूणाने जरी आत्महत्या केली असली तरी ती शासनाच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. सरकारचं नाकर्ते धोरण असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. MPSC परीक्षेची वाट पाहतायेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. आज मुलांनी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. परंतु नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला.

तसेच सरकारला विद्यार्थ्यांचं काही देणंघेणं नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्या करिअरची काळजी आहे. परंतु कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून MPSC दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाही. स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.  

काय आहे प्रकरण?

स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(MPSC) परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

आत्महत्येमुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये रोष

MPSC स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे यांनी सांगितले की, परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाला जड जाईल. असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही असा रोष विद्यार्थ्यांमध्ये आहे.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेparth pawarपार्थ पवारMPSC examएमपीएससी परीक्षाBJPभाजपा