शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

"कुछ तो गडबड है, अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे…’’ संजय राऊत यांचं सूचक ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 13:42 IST

CBI raid today in maharashtra : एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थान तसेच कार्यालये अशा मिळून दहा ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (CBI raid on Anil Deshmukh residence) एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआयने केलेल्या या संपूर्ण कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे. ("Something's wrong,'' Sanjay Raut criticizes CBI, Central Government over raid on Anil Deshmukh's residence)

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, ‘’कुछ तो गडबड है. मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही. कुछ तो गडबड जरुर है, असे म्हणत संजय राऊत यांनी या संपूर्ण कारवाईवरच शंका घेतली आहे. 

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर आज सकाळपासून सुरू झालेले धाडसत्र अद्याप सुरू आहे.  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. 

अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं १४ एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSanjay Rautसंजय राऊतCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाPoliticsराजकारण