शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे खासदार झाले कृषीमंत्र्यांचे व्याही; राजन विचारेंची लेक बनली दादा भूसेंच्या घरची सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:52 IST

मालेगावातील आनंद फार्म येथे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न उरकण्यात आलं.

नाशिक – ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येचं कृषीमंत्री दादा भूसे यांच्या मुलासोबत विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही लग्न सोहळ्याला हजेरी लावून दोन्ही नवदाम्पत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दादा भूसे यांचा मुलगा अविष्कार आणि राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोहळा पार पडला.

मालेगावातील आनंद फार्म येथे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न उरकण्यात आलं. लग्नाबद्दल कोणतीही वाच्यता न करता अतिशय गुप्तपणे हा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक आणि काही मान्यवर नेतेच उपस्थित होते. इतर कोणालाही या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं नाही. मीडियालाही या लग्न सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. ज्याठिकाणी हा सोहळा पार पडला तिथे परवानगीशिवाय कोणालाही आतमध्ये एन्ट्री नव्हती.

कोरोनाची परिस्थिती पाहता केवळ प्रतिष्ठीत व्यक्ती यांना आतमध्ये सोडण्यात येत होते. राज्यातील काही आमदार-खासदारही या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे लग्न सोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिसही तैनात होते. या विवाह सोहळ्याला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ऑनलाईन उपस्थिती लावत नववधुवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या