शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 12:33 IST

sanjay raut reaction on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी गेल्याच्या निर्णयाचे संजय राऊतांकडून स्वागत

ठळक मुद्दे'राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही'-शरद पवार

मुंबई: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर(Cabinet Expansion) देशाच्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्याकडे देण्यात आली आहे. शाहकडे सहकार खाते गेल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारावर याचा परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या निर्णयाचे शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी स्वागत केले आहे. अमित शाहंना सहकाराचा अनुभव असल्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगले करतील, असा विश्वास राऊतांनी बोलून दाखवला. 

संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, केंद्र सरकारला सहकारात काही मदत करायची इच्छा असेल, म्हणून त्यांनी नव्या मंत्रालयाची स्थापना केली आहे. परंतु, सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शाहंकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. शाहंना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो, असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे. 

'राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही'अमित शाहंकडे सहकार खात्याची जबाबदारी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांनादेखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारHome Ministryगृह मंत्रालयBJPभाजपा