मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 03:02 PM2020-07-31T15:02:47+5:302020-07-31T15:13:19+5:30

हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

Shiv Sena venomous criticism on MNS Raj Thackeray criticism | मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

Next
ठळक मुद्देसरकार जनतेच्या पाठिशी उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजेसरकार चांगले काम करत आहे, त्यावर चांगले बोललं पाहिजेराज ठाकरेंच्या टीकेला शुभ बोल रे नाऱ्या एवढचं मी म्हणेन

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी शुभ बोल रे नाऱ्या...या शब्दात राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. राज्य सरकार चांगलं काम करतंय, त्याचं कौतुक केले पाहिजे असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचं सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर सुभाष देसाई यांनी उत्तर दिलं आहे.  

एबीपीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या टीकेवर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या एवढचं मी म्हणेन, सरकार चांगले काम करत आहे, त्यावर चांगले बोललं पाहिजे, सरकार जनतेच्या पाठिशी उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे, त्यातील कमतरता भरुन काढू, पण चांगल्या कामाचंही कौतुक करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनासोबत आपल्याला जगावं लागेल, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं लागणार आहे, सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत. ही मागणी चुकीची नाही पण कोरोनाचं संकट गंभीर आहे. मात्र उद्योग सुरु करावे लागतील, उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत, एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी दाखवली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना योजना सुरु केली आहे अशी माहितीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीये, दिसला नाही. कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खासगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ती नाकारू कशी शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले पण कारभार दिसला नाही; हे सरकार पडावं अशी इच्छा नाही, पण...”

..म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

‘या’ पाकिस्तानी गुंतवणूकदारासोबत बॉलिवूड कलाकारांचे कनेक्शन; दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचा आरोप

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

कुवेतमध्ये भारतातून येणाऱ्यांना 'नो एन्ट्री'; 8 लाख कामगारांना बसू शकतो फटका

Web Title: Shiv Sena venomous criticism on MNS Raj Thackeray criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.