“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:48 PM2021-07-31T14:48:00+5:302021-07-31T14:49:50+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद आणखीनच उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.

shiv sena sanjay raut taunts narayan rane over shiv sainik | “नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत

“नारायण राणे कुठेही गेले तरी, शिवसैनिक म्हणूनच ओळख कायम राहणार”: संजय राऊत

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसैनिक कधीच माजी होत नाहीनारायण राणे यांची शिवसैनिक म्हणून ओळख कायम राहणारशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा खोचक टोला

अहमदनगर: गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद आणखीनच उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांवरून नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करताना दिसत आहे. शिवसेनेकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावत, ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिक म्हणूनच राहणार असल्याचे म्हटले आहे. (shiv sena sanjay raut taunts narayan rane over shiv sainik)

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणतात, कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. सत्ता हा मानसिक आधार असतो. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठवू का असा दम देऊ शकतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. तसेच गुजरातेतदेखील सामना पेपर घेतात, असे राऊत यांनी नमूद केले. नगर येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी कानपिचक्या दिल्या. 

“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”

नारायण राणे यांची शिवसैनिक म्हणून ओळख कायम राहणार

संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असे म्हटले जात नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते. तुम्ही कुठेही जा, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला.

“मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा चिमटा काढत दिल्लीच्या‌ तख्तावरही भगवा फडकवू. हरलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तीच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असे संजय राऊत म्हणाले. 

Web Title: shiv sena sanjay raut taunts narayan rane over shiv sainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.