“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:12 AM2021-07-31T10:12:20+5:302021-07-31T10:14:30+5:30

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

prahlad modi says refuse to pay gst then not only uddhav thackeray but pm modi will also come to you | “GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

Next
ठळक मुद्देसामूहिकरित्या GST भरायला नकार द्याएकीचे बळ दाखवा आणि आता लढायला शिकापंतप्रधान नरेंद्र मोदींचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांचा व्यापाऱ्यांशी संवाद

उल्हासनगर: सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या. मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधाननरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील. रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचे बळ दाखवा आणि आता लढायला शिका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केले आहे. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. (prahlad modi says refuse to pay gst then not only uddhav thackeray but pm modi will also come to you)

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त करत केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची मागणी केली. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात अनेक व्यापाऱ्यांवर पँडेमिक अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून, महाराष्ट्रातही ते मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

आता लढायला शिका

उल्हासनगर शहर हे निर्वासितांचे शहर असून, या शहराला सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर बोलताना रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार आहात? आता लढायला शिका, असे आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केले. तसेच तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही, तर पंतप्रधान मोदीही तुमच्याकडे येतील, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. 

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

चहावाला नाही, तर चहावाल्याची मुलगा म्हणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, असे प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठे केले, पण नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हटले जाते. त्याऐवजी म्हणायचे असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले. 
 

Web Title: prahlad modi says refuse to pay gst then not only uddhav thackeray but pm modi will also come to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app