आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:51 AM2021-07-31T08:51:55+5:302021-07-31T08:58:10+5:30

आता TATA चा 5G मध्ये प्रवेश होणार असून, Airtel च्या मदतीने Reliance Jio ला मोठी टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Reliance Jio च्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्र ढवळून निघाल्यासारखे झाले. स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. Airtel ने 5G चाचण्या सुरू केल्यानंतर अलीकडेच मुकेश अंबानी यांनी Jio 5G ची घोषणा केली.

भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच 5G सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता TATA ग्रुपचा यामध्ये समावेश झाला आहे.

टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता TATA ग्रुपचा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. टाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे.

TATA सन्सची साहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनी पॅनोटोनाल २५८ रुपये प्रति शेअर या दराने १.९४ कोटी इक्विटी शेअर देईल. याचे एकूण मुल्य ५०० कोटी रुपये असेल, अशी माहिती Tejas Network कडून देण्यात आली आहे.

पॅनाटोनकडून तेजस नेटवर्कच्या १३ लाख इक्विटी शेअर्सचे अधिग्रहण केले जाणार असून, काही वर्षांत हा करार पूर्ण झाल्यानंतर TATA सन्सची तेजस नेटवर्कमध्ये ७२ टक्के हिस्सेदारी असेल. याद्वारे टाटा सन्सच्या कंपनीकडे मोठी हिस्सेदारी येणार आहे.

TATA ग्रुप 5G नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल सांगायचे तर टीसीएसच्या मदतीने हे काम करणे शक्य होईल. तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट मिळेल.

अलीकडेच Bharti Airtel आणि TATA ग्रुपची कंपनी टीसीएसने भारतात ५जी नेटवर्कसाठी स्ट्रॅटिजिक पार्टनरशिपची घोषणा केली होती. टेलिकॉम कंपनी एअरटेल जानेवारी २०२२ पर्यंत भारतात 5G नेटवर्कच्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप भारतात 5G साठी पूर्ण तयारीत आहे. रिपोर्टनुसार, तेजस नेटवर्क आणि टाटा सन्सकडून PLI स्कीम अंतर्गत इन्सेंटिव्हसाठी देखील अर्ज करण्यात आला आहे. तेजसच्या स्थापनेचा उद्देशच टेलिकॉम कंपन्यांना इक्विपमेंट्सचा पुरवठा करणे हा आहे.

एकीकडे Jio देशाला २जी मुक्त करत, 5G युक्त करण्याची घोषणा करत आहे. तर आता TATA ग्रुप देखील तेजसमध्ये हिस्सेदारी खरेदी करत जिओला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे.

सन २०१८ मध्ये ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती RATAN TATA यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

Generic Aadhaar जवळपास ७०० ते १००० प्रकारच्या जेनेरिक औषधांची विक्री करते. संपूर्ण देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेट उघडण्याचे लक्ष्य कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. देशातील १८ राज्यांमध्ये Generic Aadhaar च्या फ्रेंचायजी सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे, अलीकडेच टाटा समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

ई फार्मसी 1MG मध्ये बहुतेक शेअर्स हे सध्या टाटा डिजीटलकडे आहेत. 1MG सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत असून, कंपनीच्या फ्रँचायजीसाठी रांगा लागत आहेत. टाटा ग्रुपने यासाठी ‘सेहत के साथी’ नावाचा प्रोग्राम लॉंच केला आहे.