मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:17 PM2021-07-28T18:17:20+5:302021-07-28T18:19:02+5:30

कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय Paytm कडून घेण्यात आला आहे.

paytm plans to hire 20 thousand sales executive check how to apply | मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोनाच्या कालावधीत लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारी वाढली. मात्र, आता हळूहळू उद्योग, व्यापार, व्यवसाय पूर्वपदावर येत असून, नोकरीच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त होताना दिसत आहेत. कोरोना काळात मात्र डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याच डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर असलेल्या Paytm कंपनी मोठी भरती प्रक्रिया राबवत असून, २० हजार तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. (paytm plans to hire 20 thousand sales executive check how to apply) 

डिजिटल व्यवहारांमध्ये देशात आघाडीवर असलेली Paytm आतापर्यंतचा सर्वांत मोठा म्हणजेच १६ हजार ६०० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत असून, यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय Paytm कडून घेण्यात आला असून, आता अंडर ग्रॅजुएट तरुणांना रोजगाराची संधी देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.  

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

फील्ड सेल्स एक्झिक्यूटिवसाठी भरती

Paytm कडून २० हजार फील्ड सेल्स एक्झिक्यूटिव भरले जाणार आहेत. यामध्ये व्यापारी आणि युझर्सना डिजिटल सेवांची माहिती देऊन डिजिटली शिक्षित करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसेच कंपनीच्या विविध उत्पादने, योजनांविषयी प्रसार करण्यासाठी या फील्ड सेल्स एक्झिक्यूटिवना प्रशिक्षित केले जाणार आहे. या पदासाठी प्रति महिना ३५ हजार रुपये पगार ऑफर केला जात आहे. तसेच कमिशन स्वरुपात अधिक पैसे कमवण्याची संधीही Paytm कडून दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

कोण करू शकतं अर्ज?

वय वर्ष १८ वर्षांवरील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात. तसेच १० वी, १२ वी तसेच ग्रॅजुएट असलेल्या व्यक्तीही या पदांसाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे. Paytm अॅपच्या माध्यमातून आपण आपला अर्ज सादर करू शकता. ज्यांच्याकडे टू-व्हिलर आहे तसेच विक्री-विपणनाचा अनुभव आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या पदावर काम करण्यासाठी स्थानिक भाषेची उत्तम जाण आणि परिसराची चांगली ओळख असायला हवी. 

TATA ग्रुपमध्ये पार्टनर होण्याची उत्तम संधी! केवळ १० हजार गुंतवा आणि मोठी कमाई करा

दरम्यान, Paytm चा IPO लवकरच शेअर मार्केटमध्ये येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा IPO येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. Paytm ने IPO साठी सेबीकडे अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. 
 

Web Title: paytm plans to hire 20 thousand sales executive check how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.