TATA ग्रुपमध्ये पार्टनर होण्याची उत्तम संधी! केवळ १० हजार गुंतवा आणि मोठी कमाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:22 PM2021-07-15T18:22:24+5:302021-07-15T18:26:20+5:30

tata group 1mg: फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

कोरोना कालावधीत अनेक उद्योग, कंपन्या, व्यवसाय बंद झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, याच कालावधीत मेडिकल क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. (tata group)

मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेतील सेवा कंपन्यांची उलाढाल याच कालावधीत कोट्यवधींनी वाढली असून, शेअर मार्केटही उच्चांकी पातळीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना संकटामुळे ऑनलाइन व्यवहार आणि ऑनलाइन सेवा यांमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मेडिकल क्षेत्रात ऑनलाइनच्या माध्यमातून घरपोच औषधांचा पुरवठा करणारी कंपनी म्हणजे 1MG.

अलीकडेच टाटा समूहाने या कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला असून, यामध्ये व्यवसाय करण्याची उत्तम संधी आहे. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

ई फार्मसी 1MG मध्ये बहुतेक शेअर्स हे सध्या टाटा डिजीटलकडे आहेत. 1MG सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत असून, कंपनीच्या फ्रँचायजीसाठी रांगा लागत आहेत.

अनेकजण या 1MG च्या फ्रँचायजीमधून चांगली कमाई करताना दिसत आहेत. टाटा ग्रुपने यासाठी एक प्रोग्राम लाँच केला आहे. ‘सेहत के साथी’ असे या प्रोग्रामचे नाव आहे. यानुसार तुम्हाला एक एरिया दिला जाईल, तिथे तुम्हाला नवे ग्राहक शोधावे लागतील. तुम्ही जेवढे ग्राहक जोडाल, तेवढं तुम्हाला कमिशन मिळेल.

जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हालाही या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचे असेल, तर केवळ दहा हजाराच्या गुंतवणुकीत तुम्ही ते होऊ शकता. यामध्ये ब्लड प्रेशर चेक करण्याचे मशीन, शुगर चेक करण्याचे मशीन आणि ५०० व्हिजिटिंग कार्ड मिळतील, असे सांगितले जात आहे.

सन २०१५ मध्ये 1MG ची स्थापना झाली होती. वेबसाइटनुसार, ऑनलाईन डॉक्टर, ऑनलाईन औषधे, लॅब टेस्ट, ब्लड टेस्ट अशा मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

याशिवाय इथे आयुर्वेदिक औषधेही मिळतात. कोरोना चाचण्या, सल्ला अशा सुविधाही देण्यात येत आहेत. ई फार्मसी व्यवसाय वेगाने वाढत आहे.

काही रिपोर्टनुसार, भारतात ई-फार्मसी बिझनेस २०२३ पर्यंत २.७ अब्ज डॉलर वाढले, असे सांगितले जात आहे. या उद्योगाची उलाढाल २५०० कोटींपर्यंत आहे, असे म्हटले जात आहे.

Read in English