शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 19:58 IST

पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही, राऊत यांचं वक्तव्य

ठळक मुद्देपंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही, राऊत यांचं वक्तव्यसध्या देशभक्त आणि देशद्रोहींची व्याख्या निराळी - राऊत

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या संबोधनादरम्यान आंदोलनजीवी असा उल्लेख केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही सर्वकाही आहोत, आम्ही बुद्धीजीवी आहोत, आम्ही आंदोलनजीवी आहोत, आम्ही कमलजीवी आहोत. हा देश जीवांनीच तयार झाला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी हे स्वत: एक आंदोलनजीवी होते," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम अयोध्येचा प्रवास केला. ते श्रीनगरच्या लाल चौकातही गेले. महाराष्ट्रात भाजप आंदोलन करत आहे. तर काय भाजपा पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत आहे का? पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही. हा देश जनआंदोलनातूनच तयार झाला आहे," असंही राऊत यावेळी म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु लोकांनाही त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीदेखील आंदोलन केल्याचं ते म्हणाले.देशभक्त आणि देशद्रोहींची निराळी व्याख्या"देशभक्त आणि देशद्रोहींची आता वेगळी व्याख्या तयार झाली आहे. जे भाजप विरोधी सरकार आहे त्यांनी काहीही केलं तर तो देशद्रोह होतो. मुंबईमध्ये आम्ही टीआरपीचा तपास केला तर बड्या व्यक्तींनी आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे ट्वीट केले ते कोणाच्या दबावाखाली केले का याचा तपास सरकार करत आहे," असं राऊत म्हणाले. अमित शाहंच्या वक्तव्यावरही प्रतिक्रियायावेळी ५०-५० फॉर्म्युलावर आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती असं अमित शाह म्हणाले होते यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली ती आमित शाह आणि उद्धव ठाकरे यांनाही माहित आहे," असं ते म्हणाले. तसंच सामना कधीही बदलणार नाही. जे लोकं चुका करणार त्यांच्याविरोधात आम्ही लिहित असतो. याबाबतीत महाराष्ट्रात चर्चा होत आहे आणि काँग्रेसही आमच्यासोबतच आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAmit Shahअमित शहाTRP Scamटीआरपी घोटाळा