Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:37 PM2021-06-17T23:37:44+5:302021-06-17T23:39:01+5:30

Maratha Reservation: मूक आंदोलन सुरू राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

sambhaji raje says protest will continue for maratha reservation | Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे

Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे

Next

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून राजकारण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात मूक आंदोलन केले. यानंतर आता राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यांनी सांगितले. यावेळी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली. मूक आंदोलन सुरू राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. (sambhaji raje says protest will continue for maratha reservation)

मराठा आरक्षण आणि काही मागण्यांसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा झाली. सरकार सकारात्मक आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. तूर्तास तरी आंदोलन मागे घेणार नाही. मूक आंदोलन सुरूच राहील, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

सरकारकडून आंदोलन थांबवण्याची विनंती

कोल्हापूरमधून सुरू झालेले मूक आंदोलन राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरू आहे. २१ जूनला सकल मराठा समाजाच्यावतीने नाशिकला मूक आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

सारथीबाबत पुण्यात बैठक

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला पायावर उभा करु शकतो. अधिकारी वर्गाकडून योग्य रित्या काम होत नसल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी शनिवारी यासंदर्भात पुण्यात बैठक होणार आहे. सरकारने लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
 

Web Title: sambhaji raje says protest will continue for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app