“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:20 PM2021-06-17T22:20:36+5:302021-06-17T22:22:04+5:30

pradeep sharma nia raid: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे.

bjp nitesh rane criticises uddhav thackeray over pradeep sharma nia raid | “उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

Next

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत ठेवलेली स्फोटके आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेला मृत्यू याप्रकरणी आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या सगळ्याचे गॉडफादर हे उद्धव ठाकरे असल्याचा मोठा दावा राणे यांनी केला आहे. (bjp nitesh rane criticises uddhav thackeray over pradeep sharma nia raid)

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी गुरुवारी सकाळी ६ वाजता एनआयएने छापा टाकला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने हा छापा टाकल्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली असून, २८ जूनपर्यंत एनआयए पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. या एकंदर पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

या सगळ्याचे गॉडफादर हे उद्धव ठाकरे

अँटिलिया स्फोटक प्रकरण किंवा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक होणारा किंवा चौकशी केली जाणारा प्रत्येक जण शिवसेनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित कसा असतो? हा फक्त योगायोग असू शकत नाही! आणि तरीदेखील आपण विचार करतोय की, यांचा गॉडफादर कोण असेल? ते उद्धव ठाकरे आहेत, अशी मोठा दावा नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

“हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

दरम्यान, अँटिलियाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्यामुळे मुंबईत मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, या स्कॉर्पिओचे मालक व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येमुळे तर त्याहून मोठा गोंधळ झाला. या प्रकरणात आत्तापर्यंत ४ जणांना अटक केली असून त्यामध्ये तीन पोलिसांचा समावेश आहे. 
 

Web Title: bjp nitesh rane criticises uddhav thackeray over pradeep sharma nia raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.