Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:51 PM2021-06-17T18:51:33+5:302021-06-17T18:54:16+5:30

Ram Mandir: भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा परमहंस दास यांनी केला आहे.

paramhans das claims aap and congress offered 100 crore to oppose bjp on ram mandir land dispute | Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

Next
ठळक मुद्देपरमहंस यांचा मोठा दावाभाजपला विरोध करण्यासाठी १०० कोटींची ऑफरपरमहंस यांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ

नवी दिल्ली: अयोध्येतील जमिनीच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेला आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच राम मंदिराशी निगडीत संस्था, संघटनांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता परमहंस दास यांनी मोठा दावा केला आहे. भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा दास यांनी केला आहे. (paramhans das claims aap and congress offered 100 crore to oppose bjp for ram mandir land dispute)

राम मंदिर न्यासने केंद्र सरकारला या प्रकरणी स्पष्टीकरण पाठवले असून, बाजारभावापेक्षा अधिकच्या किमतीमध्ये जमीन खरेदी केले नसल्याचे म्हटले आहे. याआधी काँग्रेसकडून यासंदर्भात केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असून, २ कोटी रुपयांची जमीन पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला होता. 

“RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

सकाळी ७ वाजता दोन व्यक्ती आल्या होत्या

परमहंस दास यांनी म्हटले आहे की, जमीन गैरव्यवहार नसून, राजकीय नेत्यांची ही मोठी खेळी आहे. १७ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन व्यक्ती आल्या. यावेळी त्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली आणि भाजपचा विरोध आणि आरोप करण्यास सांगितले. तसेच शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांना आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने ५० कोटी रुपये दिले असून, त्यांच्या अनुयायांनी या कामाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत आम आदमी पक्ष किंवा काँग्रेसचा विजय झाल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असेही त्या दोन व्यक्तींनी सांगितल्याचा दावा परमहंस यांनी केला. तसेच आपण एक संत आहोत. राष्ट्रहित सर्वोपरी असल्याचे ठामपणे सांगितले. त्या दोन व्यक्ती आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून पाठवण्यात आल्या होत्या, असेही परमहंस यांनी म्हटले आहे. 

देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार

RSS टॅक्स का भरत नाही

दरम्यान, राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या स्थापनेला ९५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही अद्याप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का नाही झाली? ही संघटना इन्कम टॅक्स का भरत नाही? ते या देशाचे मालक आहेत का? गेल्या तीन पीढ्यांना मूर्ख बनवण्याचे काम संघवाले करतायत. मात्र, सुदैवाने त्यांना यात यश आलेले नाही. कारण या तीनही पिढ्या हुशार होत्या, अशी टीका पवन खेडा यांनी केली आहे. 
 

Web Title: paramhans das claims aap and congress offered 100 crore to oppose bjp on ram mandir land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app