Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:00 PM2021-06-17T21:00:21+5:302021-06-17T21:01:05+5:30

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. 

ashok chavan says state govt will file reconsideration petition in supreme court over maratha reservation | Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या बैठकमराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणारसंभाजीराजे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ७ मागण्या

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून राजकारण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात मूक आंदोलन केले. यानंतर गुरुवारी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर, मराठा आरक्षणप्रकरणीराज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. (ashok chavan says state govt will file reconsideration petition in supreme court over maratha reservation)

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह संभाजीराजे उपस्थित होते. यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. 

पुनर्विचार याचिका दाखल करणार 

मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. योग्य तयारी करून मगच पुन्हा एकदा न्यायालयासमोर बाजू मांडली जाणार आहे. पुनर्विचार याचिका नुसती दाखल करून अर्थ नाही.  ५० टक्के मर्यादा घालण्यात आली आहे. या बाबी पाहाव्या लागणार आहेत. आठवडाभरात पिटीशन दाखल झाली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. 

संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ७ मागण्या

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली. संभाजीराजे यांनी मुख्यंत्र्यांसमोर सात प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. हॉस्टेल उपलब्ध करून द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. आम्ही २३ जिल्ह्यात त्यासाठी जागा उपलब्ध  करून देत आहोत. कालबद्ध कार्यक्रम म्हणून आम्ही हे करू.  मुख्यमंत्री या विभागाचा आढावा घेऊन कारवाई कशी होते हे पाहणार आहेत, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

बाजी पलटली! बंडखोर पशुपतीकुमार पासरच झाले पक्षाध्यक्ष; बिनविरोध निवड

दरम्यान, भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भातील मूक आंदोलनात उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ashok chavan says state govt will file reconsideration petition in supreme court over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app