शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 2:40 PM

Maharashtra Budget Session 2021: मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता; समाजवादी पक्षाच्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार

मुंबई: अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली. त्यामुळे अधिवेशन वादळी होणार असल्याचं पहिल्याच दिवशी दिसून आलं. त्यातच आता मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेना अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (samajwadi party mla abu azmi muslim demands muslim reservation)ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपलीमहाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचं मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी यासाठी फलक घेऊन विधिमंडळ परिसरात घोषणा दिल्या. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात प्रस्ताव आणण्याची मागणीदेखील त्यांनी केली. प्रस्ताव न आणल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारादेखील त्यांनी दिला."धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणासमाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी मुस्लिम आरक्षण, सीएए, एनआरसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री अस्लम शेख यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं. 'आम्ही मुस्लिम आरक्षणाशी कटिबद्ध आहोत. पुढील काही दिवसांत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल,' असं शेख म्हणाले. राज्यात एनआरसी, सीएए विरोधात आंदोलनं झाली आहेत. त्यामुळे त्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाहीत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.शिवसेना अडचणीत येणार?समाजवादी पक्षानं केलेली मागणी आणि त्याला मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी दिलेलं उत्तर शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं. काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका मुस्लिम आरक्षणाच्या बाजूनं आहे. पण शिवसेनेची विचारधारा हिंदुत्ववादी असल्यानं त्यांना मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीका अनेकदा भाजपकडून होत असते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अर्थसंकल्पी अधिवेशनात शिवसेनेसाठी अडचणीचा ठरू शकतो.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMuslimमुस्लीमreservationआरक्षणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी