सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 11:54 AM2020-07-12T11:54:02+5:302020-07-12T11:55:52+5:30

कोरोना संकटकाळात काँग्रेसशासित राजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Sachin Pilot and Jyotiraditya Scindia connection ?; Increased tension of CM Ashok Gehlot | सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

googlenewsNext
ठळक मुद्देराजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहेमध्यप्रदेशात जे घडलं तेच राजस्थानमध्ये घडत असल्याचं दिसून येते. राजस्थानात एकूण २०० आमदारांपैकी १०७ आमदार काँग्रेसचे आहेत.

नवी दिल्ली – राजस्थानमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट दिल्ली मुक्कामी आहेत. काँग्रेसचे २४ आमदार दिल्लीनजीक विरोधी पक्षाचं सरकार असणाऱ्या एका राज्यात हॉटेलमध्ये राहणे आणि पक्षाच्या नेतृत्वाशी संपर्कात नसणे यावरुन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला आहे.

कोरोना संकटकाळात काँग्रेसशासितराजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वकाही अशाप्रकारे होत आहे जसं ४ महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळलं होतं. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. कमलनाथ यांच्याप्रमाणे त्यांच्या सरकारवरही टांगती तलावर लटकली आहे. (Rajasthan Politics)

४ महिन्यापूर्वी मध्यप्रदेशात जे घडलं तेच राजस्थानमध्ये होताना दिसत आहे. त्यात अनेक समान धागेदोरे आहेत, तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या २२ आमदारांचा राजीनामा देऊन कमलनाथ सरकार पाडलं होतं. या आमदारांना पहिल्यांदा गुडगाव आणि त्यानंतर बंगळुरुच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. कमलनाथ यांच्यासमोर तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे होते, तर अशोक गहलोत यांच्यासमोर आता सचिन पायलट आहेत. मागील ३ दिवसांपासून पायलट दिल्लीत आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या काँग्रेसचे (Congress MLA) २४ आमदार शनिवारी रात्री गुडगाव येथील मानेसरमधील एका हॉटेलात मुक्कामी आहेत, अनेकांचे फोन स्विचऑफ आहेत.

२०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते, तरीही कमलनाथ आणि अशोक गहलोत यांनी बाजी मारली, राहुल गांधींच्या कोअर कमिटीतील सदस्य ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ यांची एकमेकांसोबत मैत्री आहे. जेव्हा मध्यप्रदेशात शिंदे समर्थकांनी काँग्रेसची साथ सोडली तेव्हा सचिन पायलटही ज्योतिरादित्य शिंदे यांचा मार्ग स्वीकारतील असं बोललं जात होतं.

सचिन पायलट सध्या दिल्लीत आहेत, ते भाजपाच्या (BJP) संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. या चर्चांना बळ तेव्हा मिळालं जेव्हा शनिवारी रात्री मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीत पायलट यांच्यासह इतर मंत्री गैरहजर राहिले. सध्याच्या राजकीय घटनाक्रमांवर कोणीही अधिकृतपणे भाष्य करत नाही. काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर केला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत वाद असल्याचं सांगत भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत.

राजस्थानात एकूण २०० आमदारांपैकी १०७ आमदार काँग्रेसचे आहेत. त्याशिवाय १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा गहलोत सरकारला आहे. आरएलडीचे एक आमदार सुभाष गर्ग हे सरकारमधील मंत्री आहेत. तर विधानसभेत भाजपाचे ७२ आमदार आहेत, अशोक गहलोत यांच्या सरकारच्या पाठिशी सध्या १२१ आमदारांचा पाठिंबा आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

आठवणीतला किस्सा! जेव्हा चीनच्या पंतप्रधानांसोबत शरद पवार समुद्र किनारी वॉकिंग करत होते तेव्हा...

सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल

शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...

Web Title: Sachin Pilot and Jyotiraditya Scindia connection ?; Increased tension of CM Ashok Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.