काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:38 PM2020-06-05T13:38:19+5:302020-06-05T13:39:00+5:30

अडचणीच्या काळात गुजरात काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके मिळत आहेत. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे.

Resignation of another Congress MLA in Gujarat before Rajya Sabha elections | काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा; राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार

Next

अहमदाबाद – गुजरातमध्ये १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का मिळाला आहे. काँग्रेसचेआमदार बृजेश मेरजा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनाम दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी दोघांचे राजीनामे स्वीकारले आहे.

अडचणीच्या काळात गुजरात काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके मिळत आहेत. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसकडे ६५ आमदारांचे संख्याबळ राहिलं आहे. गुजरात विधानसभेत एकूण १७२ सदस्य आहेत. तर १० जागा रिक्त आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जूनला निवडणूक होणार आहे. यातील ३ जागा सध्या भाजपाकडे तर उर्वरित एक जागा काँग्रेसकडे आहे.

नियमांनुसार, राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी उमेदवाराकडे सिंगल ट्रासफरेबल वोट अंतर्गत ३६ मतांची गरज असते. भाजपाकडे १०३ आमदार आहेत, भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे पण एकामागून एक कॉंग्रेसच्या आमदारांचे राजीनामा दिल्याने पक्षाची अडचण झाली आहे. भारतीय आदिवासी पक्षाचे विधानसभेत (बीटीपी) दोन आमदार आहेत, एक राष्ट्रवादी आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आहेत. राजीनामा सत्रामुळे आता सर्वांचे लक्ष या आमदारांच्या मताकडे लागले आहे.

काय आहे गणित?

यावेळी गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन (बीटीपी) आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३६ मते आवश्यक आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेस २ बीटीपी आमदार व एक अपक्ष अशी त्यांची संख्या ७१ मानत होती. अशा प्रकारे काँग्रेस सहजपणे २ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहत होती. दुसरीकडे ३ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपला १०६ आमदारांची गरज भासणार आहे. याचा अर्थ असा की भाजपाला तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आणखी ३ मतांची आवश्यकता असेल. तिसरा उमेदवार म्हणून भाजपाने नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे.

२०१७ सारखी पुन्हा परिस्थिती

गुजरात पुन्हा एकदा २०१७ सारखी परिस्थिती दिसत आहे. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे करुन कॉंग्रेसचे दिग्गज अहमद पटेल यांची जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी निवडणुकीच्या अगदी आधी राजीनामा दिला होता. एक मत रद्दबातल झाल्यामुळे अहमद पटेल निवडून आले होते. पण त्यासाठी कॉंग्रेसला निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...अन् ७ वर्षाच्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठलं; घडलेला प्रकार ऐकून पोलीसही हादरले

शेतात काम करताना जमिनीत नांगर अडकला; शेतकऱ्याला सोने-रत्नांचा मोठा खजिना सापडला

बाबो! नवरी नटली अन् गावभर चर्चा झाली; एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलोचा घागरा

हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी फॉर्म भरावा लागणार; Entry आणि Exit पर्यंत ‘या’ ७ गोष्टी विसरु नका!

आश्चर्य! जगात केवळ एकच व्यक्ती खरेदी करु शकणार ‘ही’ ढासू बाईक; काय आहे स्पेशल?

Read in English

Web Title: Resignation of another Congress MLA in Gujarat before Rajya Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.