आश्चर्य! जगात केवळ एकच व्यक्ती खरेदी करु शकणार ‘ही’ ढासू बाईक; काय आहे स्पेशल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:49 PM2020-06-05T12:49:49+5:302020-06-05T12:57:19+5:30

जगात सर्वात उत्तम बाईक बनवणारी इटलीची कंपनी MV Agusta ने एका अशी बाईक आणली आहे ती अतिशय रंजक आहे. या बाईकची सर्वात खास बाब म्हणजे तीचं केवळ १ युनिट बनवंली जाईल, म्हणजेच जगभरात फक्त एकच व्यक्ती ती विकत घेऊ शकेल.

ही मोटारसायकल कंपनीच्या Brutale 1000 RR सुपर-नेकेड बाईकचं अल्ट्रा लिमिटेड एडिशन वर्जन आहे. ही बाईक MV Agusta Brutale 1000 RR ML नावाने ओळखली जाईल. चला तर तुम्हाला या खास बाईकबद्दल माहिती देऊया

Brutale 1000 RR ML या मोटरसायकलचा लूक Brutale 1000 RR सारखाच आहे. ही अल्ट्रा-लिमिटेड एडिशन बाईक ब्लू आणि व्हाइट कॉम्बिनेशनसह ट्रायकलर पेंट स्कीममध्ये येणार आहे. बाईकच्या फ्रेमवर अ‍ॅल्युमिनियम व्हील्स आणि स्विंगआर्मवर गोल्डन पेंट आहे.

या बाईकच्या नावात ML या अक्षराचा संबंध या खास मोटारसायकलच्या एकमेव मालकाशी आहे. रिपोर्टनुसार ही बाईक विकत घेणाऱ्याच्या नावाचं शॉर्ट फॉर्म 'एमएल' आहे.

Brutale 1000 RR ML मध्ये कोणतेही यांत्रिक बदल केले नाहीत, म्हणजे त्याचे इंजिन स्टँडर्ड Brutale 1000 RR चे आहे. बाईकमध्ये देण्यात आलेले ९९८ सीसी इंजिन २०५ बीएचपीची पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते.

या बाईकचं इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. कंपनीचा असा दावा आहे की हे अल्ट्रा-एक्सक्लूसिव मॉडेल प्रति तास ३०० किमी वेग पकडण्यास सक्षम आहे.

Brutale 1000 RR ML बाईकमध्ये रेस, स्पोर्ट्स, रेन आणि कस्टमसह चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत. यात ५ इंचाचा हाय-रिझोल्यूशन कलर टीएफटी डिस्प्ले आहे, जो बाईकशी संबंधित बरीच माहिती प्रदान करतो.

स्टँडर्ड Brutale 1000 RR प्रमाणेच या बाईकला Ohlins सस्पेंशन आणि ब्रेम्बो स्टाईलमा ब्रेक देखील मिळतात.

MV Augusta ने या सुपर-एक्सक्लूसिव बाईकची किंमत जाहीर केली नाही. ही एकमेव मोटरसायकल बनवण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत त्याची किंमत खूप जास्त असणे अपेक्षित आहे. यामुळे कदाचितच कंपनी या बाईकची किंमत जाहीर करु शकते अन्यथा नाही.

टॅग्स :बाईकbike