शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड; काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 09:09 IST

माणिकराव जगताप यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे, काँग्रेसची मोठी हानीमंत्री अशोक चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड

मुंबई – काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव जगपात हे आजारी होते. रविवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. माणिकराव जगपात हे विद्यमान रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते.

माणिकराव जगताप यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे. मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना असं त्यांनी म्हटलं आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार, आमचे मित्र, सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहल, सुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही प्रार्थना असं त्यांनी सांगितले आहे.

कोण आहेत माणिकराव जगपात?

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचा पराभव राष्ट्रवादीचे माणिकराव जगताप यांनी केला. महाडच्या राजकीय इतिहासात हा पराभव महत्त्वाचा मानला गेला. २००४ मध्ये प्रभाकर मोरे यांचा पराभव माणिकराव जगताप यांनी अवघ्या साडेतीन हजार ७७९ मतांनी केला. तर २००९ मध्ये भरत गोगावले यांनी तब्बल १४,९६० मतांनी प्रभाकर मोरे यांच्या पराभवाचा वचपा काढला. २०१४ च्या निवडणुकीत माणिकराव जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढली आणि माणिकराव जगताप यांना २०१४ मध्येही पराभव पत्करावा लागला. या वेळी २१,२५६ मतांची आघाडी भरत गोगावले यांना मिळाली.

टॅग्स :congressकाँग्रेस