शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निरोपाची वाट पाहतायेत का?”

By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 8:59 AM

BJP Kirit Somaiya Demand to arrest of Shiv Sena Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आलं आहेपूजा चव्हाणची आत्महत्या नव्हे तर हत्या, त्यासाठी मंत्री संजय राठोड जबाबदार आहेतसंजय राठोड यांची केवळ हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी - भाजपा

मुंबई – परळीतील पूजा चव्हाण(Pooja Chavan) या २२ वर्षीय तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण हीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झालीय असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी(Kirit Somaiya) करत मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.(Minister Sanjay rathod will be arrest in Pooja Chavan Suicide Case Demand by BJP Ex MP Kirit Somaiya)  

याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) शरद पवारांच्या(Sharad Pawar) निरोपाची वाट पाहतायेत का? पूजा चव्हाणची आत्महत्या नव्हे तर हत्या, त्यासाठी मंत्री संजय राठोड जबाबदार आहेत, संजय राठोड यांची हकालपट्टी नाही तर त्यांना अटक व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आलं आहे. संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे, पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात १०-१२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.(Pooja Chavan Suicide Case)

संजय राठोड प्रकरणावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह

शिवसेनेत(Shivsena) देखील या मुद्द्यावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा शिवसेनेते एक मतप्रवाह आहे.

तर पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्याच्याच जोरावर संजय राठोड वाचण्याची शक्यताही बोलली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

संजय राठोड मौन सोडणार?

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणKirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSanjay Rathodसंजय राठोडBJPभाजपाShiv Senaशिवसेना