शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Pooja Chavan Suicide Case: “संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”; सरपंचाचा गंभीर आरोप, भाजपाचा राजीनामा

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 9:21 AM

Pooja Chavan Suicide Case, BJP Kamal Chavan criticism over Sanjay Rathod name involved: दुसरीकडे या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे येत आहेत.

ठळक मुद्देसंजय राठोड प्रकरणात भाजपाच्या सरपंचाने लावले पक्षावर गंभीर आरोप महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचं कटकारस्थानसरपंच कमल चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला राजीनामा

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येनंतर(Pooja Chavan Suicide Case) राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. २२ वर्षीय तरूणीचं कथित मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप भाजपाने(BJP) केला आहे, शिवसेना मंत्री संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) यांच्यावर थेट नाव घेऊन भाजपानं हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.( Sarpanch Kamal Chavan Resign from BJP over minister Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case)

मात्र दुसरीकडे या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या काळवटी तांडा येथील सरपंच यांनी भाजपावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण(Kamal Chavan) यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांच्याकडे मंगळवारी राजीनामा पाठवून संजय राठोड यांचे समर्थन केले आहे.

या पत्रात म्हटलंय की, मी कमल नाथराव चव्हाण काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचं कारण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षामधील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे असा गंभीर आरोप करत कमल चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.

संजय राठोड समर्थनार्थ शिवसैनिकांचा मोर्चा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर करून वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप यवतमाळ येथील शिवसैनिकांनी केला आहे, मंगळवारी नेर येथे शिवसैनिकांनी भाजपचा निषेध करत शहरातून महिला-पुरुषांच्या सहभागात मोर्चा आला. विविध प्रकारच्या घोषणा मोर्चेकरी देत होते. तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चेकरांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. दिग्रस येथेही शिवसैनिकांनी मोर्चा काढला. शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पाठविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.

संजय राठोड मौन सोडणार?

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडBJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जाती