वाशीम: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case:) चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) अखेर १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. गेल्या १५ दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत.
संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
संजय राठोड यांनी आज बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीला जाऊन दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाणच्या निधनानं संपूर्ण समाजाला दु:ख झालं आहे. मी आणि संपूर्ण समाज तिच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. पण यावरून अतिशय घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं राठोड म्हणाले. माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.
"हात जोडून विनंती करतो की..."; पूजा चव्हाण प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड बोलले
१५ दिवस कुठे होते संजय राठोड?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड बेपत्ता झाले. ते नेमके कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाला राठोड यांनी उत्तर दिलं. 'दहा दिवस पत्नी, मुलंबाळं आणि कुटुंबाला सांभाळण्याचं काम केलं. त्यासोबतच शासकीय कामही सुरू होतं. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना सांभाळण्याचं काम गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे, असं राठोड म्हणाले.
फोटो, ऑडिओ क्लिबद्दल राठोड यांचं स्पष्टीकरणपूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा करण्यात आला. संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटोदेखील व्हायरल झाले. 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मला गोवण्यात आलं आहे. घाणेरडं राजकारण केलं जात आहे. मला तिच्या मृत्युचे दु:ख आहे. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. तपासात सर्व स्पष्ट होईल,' असं राठोड म्हणाले. माझी आणि समाजाची बदनामी करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी हात जोडून केलं.
Web Title: Pooja Chavan Death Case taking care of family from 10 days says shiv sena leader sanjay rathod
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.