Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:21 PM2021-02-23T13:21:02+5:302021-02-23T13:29:30+5:30

Pooja Chavan Suicide Case: अखेर १५ दिवसांनंतर संजय राठोड सर्वांसमोर; पोहरादेवीत समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन

Direct and unambiguous message from Sanjay Rathore; What will Chief Minister Uddhav Thackeray do now? | Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Next

यवतमाळ: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case:) चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) अखेर १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. गेल्या १५ दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेश

आज सकाळी संजय राठोड बंजारा समाजाचं महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. राठोड मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्या. त्यावेळीही त्यांच्या पत्नी सोबत होत्या. या अडचणीच्या काळात आपलं कुटुंब पाठिशी असल्याचा स्पष्ट संदेश यातून राठोड यांनी दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष लागलं आहे.

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

राठोड यांचं शक्तिप्रदर्शन; पक्ष नेतृत्त्वाला संदेश?
संजय राठोड गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होते. आज ते समोर आले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवीला गर्दी केली. पोहरागडावर राठोड यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनी राठोड याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 'कोण आला रे कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला', अशा स्वरूपाच्या घोषणा राठोड यांच्या समर्थकांनी दिल्या. माझा समाज माझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असा स्पष्ट संदेश राठोड यांनी त्यांचे पक्षप्रमुख आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) दिल्याचं बोललं जात आहे. पोहरादेवीला शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



शिवसेनेत दोन सूर; धनंजय मुंडेंचा दाखल; पण...
राठोड यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जावा, असा एक सूर शिवसेनेत आहे. तर राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं असा एक मतप्रवाह असलेला गटदेखील पक्षात आहे. या गटानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा दाखला दिला. मुंडे यांच्यावर आरोप झाले, तेव्हा पक्ष त्यांच्यामागे भक्कमपणे उभा होता, असा संदर्भ या गटाकडून देण्यात येतो. पण मुंडेंवर आरोप झाले तेव्हा ते माध्यमांना थेट सामोरे गेले होते. ते बेपत्ता झाले नव्हते, असं एका गटाला वाटतं.

Read in English

Web Title: Direct and unambiguous message from Sanjay Rathore; What will Chief Minister Uddhav Thackeray do now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.