शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
4
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
5
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
6
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
7
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
8
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
9
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
10
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
11
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
12
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
13
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
14
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
15
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
16
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
17
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
18
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
19
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
20
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

Pooja Chavan Death Case: राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 13:05 IST

Pooja Chavan Death Case: संजय राठोड आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) दबाव वाढला आहे. भारतीय जनता पक्षानं राठोड यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. तर राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे विदर्भातील आमदार कामाला लागले आहेत. राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचा दावा या गटाकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी या गटानं लावून धरली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूर्व, पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळायला हवं, अशी या गटाची भावना आहे.छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी विदर्भासोबतच मुंबईतले आमदारही सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. आपला पत्ता कापला जाऊ नये यासाठी उत्सुक आमदार सावध पवित्र्यात आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या आमदांराची नावं गुलदस्त्यात आहेत. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपदाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याकडे दिली जाणार की मंत्रिपदाचा पदभार इतर एखाद्या मंत्रिपदाकडे दिला जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे.राठोडांसाठी महंतांचा दबावसंजय राठोड यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला जाऊ नये, अशी विनंती पोहरादेवीच्या महंतांकडून केली जात आहे. राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असं आवाहन महंतांकडून करण्यात आली आहे. 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आधी चौकशी होऊ द्या. दोषी आढळून येईपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका,' असं पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.'आमच्याकडून, बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री ठाकरेंवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही केवळ समाजाची भावना मांडत आहोत. मुख्यमंत्री, सरकारवर दबाव टाकण्याचा आमचा हेतू नाही,' असं जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं. संजय राठोड पुन्हा पोहरादेवीला येऊ शकतात असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. 'राठोड पुन्हा पोहरादेवीला येणार असल्याचं आम्हाला त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे. ते इथे आल्यास महंतांशी चर्चा करून पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेतील,' असं महाराज म्हणाले.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे