शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 8:44 AM

Bihar Assembly Election Result And Amit Shah : निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पाटणा - बिहारमध्ये मतदारांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सलग चौथ्यांदा पसंती दर्शवली असली तरी 20 वर्षांनंतर प्रथमच भाजपाबिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी भाजपाला 53 जागा मिळाल्या होत्या.  आतापर्यंतच्या बिहारी राजकारणात रालोआमध्ये नितीशकुमार यांचे वर्चस्व होते. जदयुला सतत मिळत असलेल्या अधिक जागा, हे त्याचे कारण होते. त्यामुळे भाजपानेही लहान भावाची भूमिका स्वीकारली होती. परंतु आता भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने तेथील गणिते बदलू शकतात. निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो" असं म्हटलं आहे. तसेच बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारमधील सर्वांचे आभार मानतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं" असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.

"हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय"

"बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये जनतेने ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

20 वर्षांनी भाजपा मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश

20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल. पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का होऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने हा दावा खोडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयोगाने म्हटलं आहे.

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारBJPभाजपाAmit Shahअमित शहाElectionनिवडणूक