UP Panchayat Election Results 2021: two times MP, lost panchayat election by 2100 votes Lucknow | UP panchayat Election: दोन वेळा खासदार, साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता आली नाही; 2100 मतांनी पराभव

UP panchayat Election: दोन वेळा खासदार, साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता आली नाही; 2100 मतांनी पराभव

UP Gram Panchayat Election 2021 लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत (Uttar Pradesh panchayat Election) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार रीना चौधरी (Ex MP reena chaudhary) यांना साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता न आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने पाडले आहे. (two times MP reena chaudhary lost Uttar Pradesh panchayat Election from lucknow  )


UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ

लखनऊच्या जिल्हा पंचायतचे अध्यक्षपद हे एससी महिलेसाठी राखीव होते. यामुळे भाजपाने माजी खासदार असलेल्या रीना चौधरी यांना वॉर्ड नंबर १५ मधून जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिली. आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला. सपा समर्थित पलक रावतने चौधरी यांना 2100 मतांनी पराभूत केले. 

वॉर्ड नंबर १५ मधून पलक यांना 8834 मते मिळाली. तर रीना चौधरी यांना 6735 मते मिळाली. यामुळे त्यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. लखनऊ पंचायतमध्ये 25 जागा आहेत. जिंकणारे सदस्य एका व्यक्तीला जिल्हा पंचायतचा अध्यक्ष निवडतात. रीना चौधरी या मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या 1998-99 आणि 1999-2004 अशा दोनदा खासदार राहिलेल्या आहेत. 2016 मध्ये त्यांना बसपामध्ये प्रवेश केला होता. परंतू पोटनिवडणुकीत सपा-बसपा आघाडी झाल्याने त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. 


उत्तर प्रदेशच्य़ा या मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत पूर्वांचल, अवध आणि मध्ये युपीमध्ये सपाचा दबदबा पहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वारणसी आणि अयोध्येमध्ये भाजपाला कडवी हार पत्करावी लागली आहे. तर पश्चिम युपीमध्ये भाजपाला विजयासाठी झगडावे लागले आहे. तिथे जाटबहुल भागात अजीत सिंहांच्या आरएलडीने भाजपावर मात केली आहे. 


पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. 

Web Title: UP Panchayat Election Results 2021: two times MP, lost panchayat election by 2100 votes Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.