शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

"२०२४ ची वाट पाहावी नाही लागणार, लवकरच मोदी सरकार कोसळणार’’, बड्या नेत्याने केले भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 1:37 PM

Modi Government News: गेल्या दीड वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे.

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होईल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता केंद्रातील मोदी सरकार हे २०२४ पर्यंत सत्तेत राहणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल आणि देशात मध्यावधी निवडणूक लागेल, असे भाकित हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी केले आहे. ( "No need to wait for 2024, Modi government will collapse soon", om prakash chautala predicts)

ओमप्रकाश चौटाला म्हणाले की, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना २०२४ ची वाट पाहावी लागणार नाही. कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणामधील सरकारवरही टीका केली आहे. राज्यात सध्या सत्तेवर असलेले भाजपा-जजपा सरकारही २०२४ पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. आता ते पुन्हा एकदा इंडियन नॅशनल लोकदलमध्ये येऊ इच्छित आहेत.

चौटाला पुढे म्हणाले की, इंडियन नॅशनल लोकदलला असलेला लोकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आता कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अभियान चालवून पक्षाला मजबूत केले पाहिजे. तसेच शेतकरी आंदोलनाला भक्कम करण्यासाठी आपले पूर्ण सहकार्य दिले पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांवर कायदे लादून त्यांना आपल्याच शेतात मजूर बनवले आहे. आता शेतकरी आंदोलनामुळे सरकारची पाळेमुळे हलली आहेत.

आज हरियाणामध्ये भय आणि भ्रष्टाचाराचे वातावरण आहे. इंडियन नॅशनल लोकदल पुन्हा सत्तेत आल्यास शिक्षण आरोग्य, रोजगार यासाठी सरकारचे धोरण ठरवले जाईल. ओमप्रकास चौटाला यांनी सांगितले की, इतर पक्षांमध्ये तिकीट पैशांवर मिळते. मात्र इंडियन नॅशनल लोकदल पक्षामध्ये तिकिांचे वाटप जनता करते. इंडियन नॅशनल लोकदल उमेदवारांकडून पैसे घेत नाही तर त्यांची मदत करते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणIndian National Lok Dalइंडियन नॅशनल लोकदल