शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राष्ट्रवादीची शिवसेनेला साथ, काँग्रेसदेखील देणार हात; पुन्हा एकदा भाजपचा करेक्ट कार्यक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 4:58 PM

NCP samajwadi party backs Shiv Sena in bmc standing committee election: मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी; काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई: मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी होणाऱ्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी, समाजवादी पक्षानं शिवसेनेला साथ दिली आहे. तर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. (BMC Standing Committee Election Shivsena gets support of NCP SP)शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारणस्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक यशवंत जाधव यांना चौथ्यांदा रिंगण्यात उतरवण्यात आलं आहे. महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेकडून आधीच्याच अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून भाजपला रोखण्यासाठी जुनी फळीच मैदानात उतरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपेतर पक्ष एकत्र येताना दिसत आहेत.नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार की..?समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल झाले आहेत. मात्र काँग्रेसकडून हे अर्ज मागे घेतले जाणार अशी चर्चा आहे. काँग्रेसदेखील शिवसेनेलाच पाठिंबा देईल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. 

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल-शिवसेना- ९२भाजप- ८२काँग्रेस- ३०राष्ट्रवादी काँग्रेस- ९समाजवादी पक्ष- ६एमआयएम- २मनसे- १अभासे- १ 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका