शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:22 PM2021-04-01T16:22:07+5:302021-04-01T16:24:28+5:30

पवार-शहा भेटीच्या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती

ncp leader jayant patil on sharad pawar and amit shah secret meeting in gujarat | शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारण

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते?; जयंत पाटलांनी सांगितलं 'गोड' कारण

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं वृत्त येताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा केला. तर खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगत येत नाही' असं म्हणत सस्पेन्स वाढवला. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला

शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही. भाजपला केवळ सत्तेची स्वप्नं पडत आहेत. पण महाविकास आघाडी भक्कम आहे, असं पाटील म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

अमित शहा- शरद पवार भेटीच्या वृतांमध्ये तथ्य नाही. साखर उद्योगातील परिषदेसाठी पवार साहेब अहमदाबादला गेले होते, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. पवार-शहा यांच्या भेटीच्या बातम्या उठवण्याचं काम भाजपकडून सतत करत आहे. आमची महाविकास आघाडी तोडण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील यांनी सांगितलं. याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीदेखील अशाच प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर भाजप नेत्यांनी मात्र केंद्रातील नेतृत्वानं आदेश दिल्यास अंमलबजावणी करू, अशी भूमिका घेतली.

केंद्रानं छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेतला. त्यावरूनही पाटील यांनी केंद्राला लक्ष्य केलं. एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो. तो काही असाच होत नाही. फाईलवर निर्णय झाला असणार. पाच राज्यांच्या निवडणुका बघून त्या राज्यांत फटका बसेल, या भीतीने हा निर्णय मागे घेतला, असं पाटील म्हणाले.

Web Title: ncp leader jayant patil on sharad pawar and amit shah secret meeting in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.