“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:45 PM2021-03-30T15:45:52+5:302021-03-30T15:48:21+5:30

Pandharpur Mangalwedha Assembly Bypoll: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

ncp leader jayant patil says that my faith on devendra fadnavis and their words | “देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते - जयंत पाटीलभाजपचा पराभव निश्चित - जयंत पाटीलशेतकरी आंदोलनाचा पश्चिम बंगालमध्ये परिणाम दिसेल - जयंत पाटील

पंढरपूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Mangalwedha Assembly Bypoll) प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले. (ncp leader jayant patil says that my faith on devendra fadnavis and their words)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील (jayant patil) हे दोन्ही नेते पंढरपुरात आहेत. जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर शेतकरी आंदोलन, निवडणुका यांवरून निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे नेते

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी भालके यांना शब्द दिलाय की, उमेदवार देणार नाही, असे मला कोणीतरी सांगितले. ०३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत आपण काही बोलायचे नाही. चिंता करू नका. दिलेल्या शब्दाला जागणारे फडणवीस आहेत. आताच फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. 

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

भाजपचा पराभव निश्चित

सगळे घटक पक्ष एकत्र आले की, भाजपचा पराभव निश्चित होते. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा सर्व घटकांचा भगीरथ भालके यांना आशीर्वाद आहे. काळजी करू नका. म्हणूनच कदाचित फडणवीस यांनी भालके यांना तसे सांगितले असावे, असे जयंत पाटील म्हणाले. 

पश्चिम बंगालमध्ये परिणाम दिसेल

चंद्रकांत पाटीलही पंढरपुरात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार असल्याचे ते म्हणाल्याचे समजले. तिथे दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करताय. त्यावर एकही शब्द अद्याप बोलला गेलेला नाही. शेकडो शेतकऱ्यांचा यादरम्यान मृत्यू झाला आहे. याचा परिणाम पश्चिम बंगालमधील निवडणुकीत दिसेल. भारतात जेव्हा जेव्हा सरकार, शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी वर्गाच्या विरोधात जाते, तेव्हा तेव्हा सरकार उलथवून टाकल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

पंढरपूरचा कार्यक्रम आम्ही करतो

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आम्ही त्यांना आग्रहाने सांगितले आहे. इकडे नाही आलात, तरी चालेल. तुमचे निष्ठावंत सैनिक ताकदीने काम करतील. अजित पवार यांच्यापासून सर्वजण या मतदारसंघात येतील. शिवसेना आणि काँग्रेसचाही पाठिंबा आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही सांगितले आहे की, माझा पाठिंबा तुमच्यावतीने जाहीर करा. चांगल्या पद्धतीने निवडणूक यशस्वी करूया. सर्वजण मिळून भाजपचा पराभव करण्याचे काम आपण करू. अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ भालकेंना तसे सांगितले असेल, तर ते अर्ज मागे घ्यायला लावतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

Web Title: ncp leader jayant patil says that my faith on devendra fadnavis and their words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.