"मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:52 AM2021-07-19T11:52:33+5:302021-07-19T11:54:30+5:30

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government And BMC : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला आहे.

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government And BMC Over Mumbai Rain | "मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण..."

"मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण..."

Next

मुंबई - मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. मदत करणाऱ्यांचेही काळीज पिळवटून निघत होते. मध्यरात्री गाढ झोपेत मुंबईकरांवर काळाने झडप घातली. याच दरम्यान मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर (Thackeray Government)  आणि मुंबई महानगरपालिकेवर (BMC) जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला आहे. तसेच "मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण..." असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "जसा बेस्ट "शी.एम" चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल. मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामनामध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"" असं देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. दुसऱ्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडूनदेखील येथे आवश्यक मदत रवाना करण्यात आली. सहा फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन यांच्यासह २० कामगार रविवारी दिवसभर येथे मदतकार्य करत होते. हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित आहे.

पावसाचे मृत्यूतांडव! ३१ बळी, शनिवारची मध्यरात्र ठरली काळरात्र; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

विक्रोळी येथे शनिवारी मध्यरात्री २.४० वाजता सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील सहा घरांवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. येथील जखमींना राजावाडी आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी येथे दाखल चार आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल एका जखमीचा मृत्यू झाला असून, महात्मा फुले रुग्णालयात दाखल जखमीस राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त ठिकाणे वनविभागाच्या अखत्यारित आहेत. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य दिवसभर सुरू होते. हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असून, येत्या ४८ तासांत मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

Web Title: MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government And BMC Over Mumbai Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.