शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

शेवटच्या टप्प्यासाठी आज सभांचा धडाका; मोदी मुंबईत, पवार ठाणे-डोंबिवलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 5:22 AM

आज मुंबई, ठाण्यात प्रचाराची रणधुमाळी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता जरी शनिवारी संध्याकाळी होणार असली, तरी शुक्रवारी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी मुंबई-ठाणे परिसर ढवळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मुंबईत धडाडेल.मोदींच्या उपस्थितीतील भाजप-शिवसेना युतीची सांगतेची सभा असल्याने ती जंगी व्हावी आणि त्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात संध्याकाळी होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने शेवटच्या दोन दिवसांत राहुल गांधी यांचा रोड शो आयोजित करण्याचे ठरविले होते. मात्र त्याबाबत अद्याप पक्षातर्फे माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डोंबिवली आणि ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे यांची ठाण्यात पत्रकार परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आधी भिवंडीत आणि नंतर मुंबईत कुर्ला येथे प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांच्या सभा होणार आहेत. राज ठाकरे यांच्या शुक्रवारी जरी नाशिक परिसरात सभा असल्या, तरी शनिवारी ते ठाण्यात मीटिंग घेणार आहेत.विखेंबाबत उत्सुकताविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मोदींच्या मुंबईतील सभेत उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस