शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

बस आणि विमान प्रवासाला परवानगी, मग लोकलला का नाही ? भाजपाचे मुंबईत अनेक ठिकाणी ‘रेलभरो’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 12:29 PM

BJP Protest For local train: लोकल प्रवासासाठी भाजपाने आज चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन केलं.

मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपाकडून मुंबईतील चर्चगेट, कांदिवली, बोरिवली,  घाटकोपर, ठाण्यात आंदोलन केलं. याशिवाय, अनेक ठिकाणी आंदोलन करण्यापासून भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. 

आज विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात लोकल प्रवासासाठी मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरेकरांसोबत यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलिसांनी आमदार नार्वेकर यांना ताब्यात घेतलं. तर, तिकडे कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. 

दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी द्यायावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, कोर्टाने रेल्वे प्रवासाबाबत विचारणा केलीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारने प्रस्ताव दिला तर लगेच रेल्वे सुरू करू असं म्हटलंय. तरीही सरकार लोकल का सुरू करत नाही? बस प्रवासाची परवानगी देता, विमान प्रवासाची परवानगी देता तर मग रेल्वे प्रवासाची मुभा का दिली जात नाही. सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं आहे ?, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच, दोन डोस घेतलेल्यांना प्रवासची मुभा देण्याची मागणीही दरेकरांनी केली.

दरेकरांना 260 रुपये दंडदरम्यान, प्रवीण दरेकर यांनी आंदोलनावेळी चर्चगेट स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लोकलमध्ये शिरले आणि त्यांनी लोकलने प्रवास करायला सुरुवात केली, काही वेळातच त्यांनी लोकल प्रवास करण्यापासून अडवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दरेकर लोकलमध्ये चढले. चर्चगेट ते चर्नीरोड असा प्रवास त्यांनी केला. विशेष म्हणजे दरेकरांनी विना तिकीट प्रवास केल्याने टीसीने त्यांना 260 रुपयांचा दंड आकारला. दरेकर यांनीही दंड भरला. पोलीस, रेल्वे प्रशासन त्यांचं काम करत आहेत. त्याला आमचा विरोध नाही. पण सरकारच्या धोरणावर आमचा आक्षेप आहे, असं दरेकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणPraveen Darekarप्रवीण दरेकरAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाBJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस