शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 8:01 AM

औरंगाबादमधून उमेदवारी न मिळाल्यानं सत्तार नाराज

मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काँग्रेसनंऔरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबादसह 5 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र इतकं करुनही पक्षानं मला डावललं. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी काल स्पष्ट केलं. शिवसेनेनं औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. खैरे यांच्याविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमध्ये आणून तिकीट द्यावं, यासाठी सत्तार यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. यानंतर सत्तार यांनी स्वत: बंड करत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAbdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेसBJPभाजपाAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन