शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: आदित्य ठाकरेंना लोकसभेत आणण्याची भाजपाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:39 IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्तीशाली राजकीय ठाकरे कुटुंबातील कोणीही आजपर्यंत संसदेची निवडणूक लढवली नाही.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्तीशाली राजकीय ठाकरे कुटुंबातील कोणीही आजपर्यंत संसदेची निवडणूक लढवली नाही. परंतु, तशी घटना घडणार असे दिसते. शिवसेनेचे दिवंगत प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेलोकसभेची निवडणूक लढवू शकतात. मात्र शिवसेनेने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.इकडे दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या चर्चेनंतर त्यांना जास्तीतजास्त मतांनी विजयी करण्याच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे की, ही बाब आमच्यासाठी मैलाचा दगड ठरेल. विशेषत: भाजपा व शिवसेना यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे निर्माण झालेली कटुता यामुळे दूर होऊ शकेल. याच कारणामुळे आम्ही आमच्याकडून त्यांना जास्तीतजास्त मतांनी जिंकून आणण्यासाठी पावले उचलण्यास तयार आहोत.आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का यावर दुसरा भाजपाचा नेता म्हणाला की, सध्या तरी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील राजकारणात खूपच व्यस्त आहेत. नजिकच्या भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याची कोणतीही शक्यता नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्वोच्च पदाचा दावेदार बनण्यासाठी बराच वेळ आहे. तोपर्यंत ते केंद्रातील राजकारणात भूमिका बजावू शकतात. अर्थात अंतिम निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असतील तर त्यांना भाजपा मुंबईतील आपली कोणतीही जागा देईल हे शक्य आहे का? आदित्य ठाकरे यांच्यासाठी मुंबई (उत्तर-मध्य) मतदारसंघ सुरक्षित आहे, असे यापूर्वी समोर आले आहे. या मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचा दबदबा आहे. परंतु, सध्या या मतदारसंघात भाजपाचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन खासदार आहेत. भाजपा शिवसेनेसाठी आपली ही जागा सोडेल का, असे विचारले असता महाराष्ट्रातील एका केंद्रीय नेत्याने म्हटले की, आधी शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव तर येऊ द्या. त्यानंतर इतर मुद्यांवर चर्चा केली जाईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा