शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 6:34 AM

विधान परिषद निवडणूक : पाचही मतदारसंघात लढत ; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी दाेन, सेना एका जागेवर रिंगणात

राजेश शेगाेकार     लोकमत न्यूज नेटवर्कअकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे.  पाचही जागांवर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत रंगण्याची संकेत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ महाविकास आघाडीची ताकद समाेर येणार असल्याने भविष्यातील निवडणुकींच्या दृष्टिकाेनातून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या राजकारणाची नांदी ठरण्याचीच चिन्हे आहेत.

 राज्यातील नागपूर, औरंगाबाद व पुणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती आणि पुणे या विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले आहेत, तर या पाच मतदारसंघांपैकी पदवीधर मतदारसंघातील पुणे व औरंगाबाद या जागा राष्ट्रवादी तर नागपूरची जागा काँग्रेस लढवत आहे. 

शिक्षक मतदारसंघात पुण्याची काँग्रेस व अमरावतीच्या जागेवर सेनेने उमेदवार दिला आहे. वरवर पाहता ही निवडणूक सार्वत्रिक व पक्षीय राजकारणाची दिसत नसली तरी, भाजपा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे पदवीधराच्या तसेच शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनांचा प्रभाव संपुष्टात आला आहे. या दाेन पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीची धुरा हातात घेतल्यामुळे ही निवडणूक भाजपा विराेधात महाविकास आघाडी, अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय-पराजय हा भाजपापेक्षा महाविकास आघाडीच्या भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला तर, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ही ताकद अजमावण्याची संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. 

भाजपामध्ये सबकुछ फडणवीसपदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी भाजपाचे उमदेवार ठरविताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम मानला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपामध्ये फडणवीस यांचे स्थान अधिकच बळकट झाले आहे. विशेषत: नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ठरविताना फडणवीस यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य यामुळे पक्षात त्यांचा शब्द अंतिम हे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस