शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सलग साडेनऊ तास चौकशी; ईडीच्या कारवाईत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 6:05 PM

महिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली

ठळक मुद्देया पथकाने स्वतासोबत सीआरपीएफचाही ताफा आणला होता. त्यात सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती.कागदपत्रे, कॉम्प्युटर, मोबाईल आणि लॅपटॉपही तपासले. सायंकाळी ५.३० वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.

नागपूर : सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांचे निवासस्थान सोडले. ईडीने महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात धडक दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक मुंबईहून गुरूवारी रात्री नागपुरात पोहोचले आणि शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता देशमुख यांच्या निवासस्थानी छापा घातला.

या पथकाने स्वतासोबत सीआरपीएफचाही ताफा आणला होता. त्यात सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यानंतर स्थानिक वरिष्ठांशी संपर्क करून पोलीस बंदोबस्त मागवून घेण्यात आला. त्यानुसार, सहायक पोलीस आयुक्त जाधव, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस आणि अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्यासह मोठा पोलीस ताफा देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचला. निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अनिल देशमुख यांच्या पत्नी, मुलगा सलील आणि सून तसेच नातवंड, घरातील कर्मचारी आणि ऑपरेटर असे १० जण आतमध्ये होते. त्यांना एकत्र बसवून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी सुरू केली. कागदपत्रे, कॉम्प्युटर, मोबाईल आणि लॅपटॉपही तपासले. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांनी आपल्या सोबत कागदपत्रे नेल्याचे सांगितले जाते.

निकटवर्तियांचीच चाैकशी

देशमुख नागपुरात नसल्याचे माहित असूनही ईडी नागपुरात धडकली. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांचीच चाैकशी करायची असावी, असा तर्क लावला जात आहे.

राष्ट्रवादीची निदर्शनेमहिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यात खदखद निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, महिला नेत्या नूतन रेवतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशमुखांच्या निवासस्थानासमोर पोहचून भाजपा आणि केंद्र सरकारच्या ईशाऱ्यावरून चाैकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत जोरदार निर्दशने केली. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने चांगलाच शिमगा केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय