"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात

By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 01:02 PM2020-12-08T13:02:42+5:302020-12-08T13:11:19+5:30

मुंबई नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज ' भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. ...

"Even if the innings is changed, the wounds of the liars are the same", says Ashish Shelar | "डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात

"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात

Next
ठळक मुद्देआशिष शेलार यांची 'भारत बंद'वर सडकून टीकागिरणी कामगारांच्या संपाची आठवण करुन देत शेलारांचा काँग्रेसवर निशाणाकृषी कायद्यावरुन राज्यातील कृषी कायद्याची करुन दिली आठवण

मुंबई
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'लामहाराष्ट्रातली चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा  दिला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 'भारत बंद'वर जोरदार टीका केली आहे. "डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", असा घणाघात आशिष शेलार यांनी विरोधकांवर केला आहे. 

आशिष शेलार यांनी एक ट्विट केलंय. "मुंबईतील गिरणी कामगारांना कुणी संप करायला लावला? कुणी कामगारांना फसवलं? कुणी कामगारांना उध्वस्त केलं? कुणी मालकांचे फायदे करुन दिले?", असा सवाल उपस्थित करत शेलार पुढे म्हणतात की, "माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!", अशी टीका त्यांनी केलीय. 

शेलार यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यात झालेल्या कृषी कायद्याबाबत भाष्य केलंय. "काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? काँग्रेसने स्वत: जे केले त्याविरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!", असं आवाहन शेलार यांनी केलं आहे. 

Web Title: "Even if the innings is changed, the wounds of the liars are the same", says Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.