शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये लालूंनी काँग्रेसला अखेर खिंडीत गाठले; पाच पक्षांचे जागावाटप जाहीर, कोणाला किती?
2
"महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात..."; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान
3
PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या
4
अरविंद केजरीवालांसाठी आता पत्नी सुनिता मैदानात! WhatsApp नंबर केला शेअर, जनतेला Video संदेश
5
कार्तिकी गायकवाडच्या घरी येणार 'लिटिल चॅम्प'; थाटात पार पडला डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
6
Astrology: जन्म-मृत्युसकट अनेक गोष्टींचे गूढ कुंडलीतील राहूच्या स्थानावरून ठरते; सविस्तर वाचा!
7
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?
8
'झलक दिखला जा ११'च्या सेटवर शिव ठाकरेसोबत घडला गैरप्रकार, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
9
छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ
10
Fact Check: लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...
11
“किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार
12
हार्दिक पांड्या-लसिथ मलिंगामध्ये काही तरी बिनसलंय? Viral व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चा
13
"केवळ आकस म्हणून नट म्हणून हिणवणे..," अमोल कोल्हेंची सीएम शिंदेंना विनंती
14
काँग्रेसला दुसरा झटका! आधी हायकोर्टाने याचिका फेटाळली, आता आयकर'ने १७०० कोटींची नोटीस बजावली
15
'या' सरकारी बँकेला इन्कम टॅक्स विभागनं ठोठावला ५६४ कोटींचा दंड, काय आहे कारण?
16
“विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात
17
डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप
18
साऊथ नाही 'भारतीय' म्हणा, अभिनेत्री संतापून म्हणाली, "त्वचा गोरी नाही म्हणून काय झालं?"
19
Health Tips: 'ऊन जरा जास्त आहे, दरवर्षीच वाढतं'; भर उन्हात ताक पिऊन गार गार वाटतं!
20
भारतात मूलं जन्माला आल्या नंतर पहिला शब्द काय बोलतात? पंतप्रधान मोदींनी बिलगेट्सना सांगितलं

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री ठरले; शरद पवारांनी सगळ्यात विश्वासू शिलेदारालाच निवडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 7:29 PM

Dilip Walse Patil will take charge of Home minister of Maharashtra: राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत होते. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)

राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही (Dilip Walse Patil) यांचेही नाव चर्चेत होते. 

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)

उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख दिल्लीला गेले आहेत. 

काय म्हणाले अनिल देशमुख?अँड जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर अनिल देशमुख म्हणाले की,उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मी गृहमंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळे, मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, असे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच, मला गृहमंत्री या पदावरुन कार्यमुक्त करावे, असेही त्यांनी म्हटलंय.

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे