"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:50 IST2021-03-29T14:45:25+5:302021-03-29T14:50:18+5:30

congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar: शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ; तर्कवितर्कांना उधाण

congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar | "अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"

"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते भेटीच्या वृत्ताचं खंडन करत असताना दुसरीकडे खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये शहा आणि पवार यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेनं याबद्दल काहीशी सावध भूमिका घेतली असताना काँग्रेसनं मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. (congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar)

यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडली

गृहमंत्री जर देशातल्या एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील, तर त्यांना याबद्दल देशाला सांगायला हवं. त्या भेटीत नेमकं काय झालं, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी म्हटलं आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली असेल, तर त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं दीक्षित म्हणाले.

‘ती’ भेट झालीच नाही, पवार-शहा भेटीची नुसतीच चर्चा, राष्ट्रवादीकडूनही खंडन

अमित शहा आणि शरद पवार यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मात्र भेटीचं वृत्त फेटाळून लावलं. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गृहमंत्री अमित शहांना भेटल्याच्या वृत्ताची चर्चा आहे. गेल्या २ दिवसांपासून ट्विटरवर तशा अफवा उडवल्या जात आहेत. मात्र अशी कोणतीही भेट झालेली नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.



पवार-शहा भेटीवर संजय राऊत म्हणतात...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार-शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर एक ट्विट केलं आहे. "मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी संजय राऊत यांनी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात असं म्हटलं होतं,'' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar