शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

बाबरी पाडली तेव्हा 'येरेगबाळे' पळून गेले, बाळासाहेब एकटे उभे होते; उद्धव ठाकरेंचा सडेतोड पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 4:59 PM

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी "तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम!!" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद प्रकरणाची भाजपला आठवण करुन दिली. 

भाजप आमदाराकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; देवेंद्र फडणवीसांकडून लगेच दिलगिरी

"भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही  शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे 

बंद दाराआडच्या वचनावरुन मुख्यमंत्री आक्रमकविधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी'ची गोष्टविरोधकांकडे पाहत आज मी तुम्हाला नारायण भंडारीची गोष्ट सांगणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'तुम्ही मला एका नारायण भंडारीची गोष्ट सांगितली. तोच नारायण भंडारी पुढे मोठा होतो. गाव सोडून जातो. मोठा माणूस होतो आणि एकदा स्वत:च्या गाडीनं गावाला येतो. तो गुरुजींच्या भेटीला जातो. मला ओळखलं का असं विचारतो. गुरुजी त्याचं कौतुक करतात. टीव्हीवर तुला रोज पाहतो म्हणतात. गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलणाऱ्या नारायणचं कौतुक करतात,' अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे